■ आमची शाळा ■
(बालगीत)
-०-

आमची शाळा, आमचा फळा
आमची मुले, आमचा मळा;
हा आमचा पसारा हो सगळा
इथे आनंदी आनंद वेगळा!
कोणी म्हणे चिऊताई
इकडे ये पाहू,
कोणी म्हणे काऊदादा
तूच माझा भाऊ,
इथे समद्यांना सगळ्यांचा लळा
इथे आनंदी.....
वही आणि पानांची
जमली येथे गट्टी
खडू आणि फळ्याला
नाही कधी सुट्टी
इथे गाण्यांना सुंदर गळा
इथे आनंदी....
कधी आम्ही रुसु
थोडं कोपऱ्यात बसू
गुरुजींचा पाठी हात
येई गालावर हसू
इथे मैत्रीचा रंग निराळा
इथे आनंदी....
किती आनंदाची शाळा
लावी आम्हांलाही लळा
स्वप्नांची ही माती तिचा
कपाळी हो टिळा
इथे नात्यांना गंध हो आगळा
इथे आनंदी....
■■■
07 अक्तूबर 2025 सुबह 8:30 बजे
रचनाकार
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
सातारा (महाराष्ट्र)
सेवार्थ निवास : शिक्षण सेवक, जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952


No comments:
Post a Comment