मच्छिंद्र बापू भिसे 9730491952 / 9545840063

'छात्र मेरे ईश्वर, ज्ञान मेरी पुष्पमाला, अर्पण हो छात्र के अंतरमन में, यही हो जीवन का खेल निराला'- मच्छिंद्र बापू भिसे,भिरडाचीवाडी, पो. भुईंज, तहसील वाई, जिला सातारा ४१५५१५ : 9730491952 : 9545840063 - "आपका सहृदय स्वागत हैं।"
Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

■ चला हो जाऊया शाळेत ■ (मराठी कविता)

■ चला हो जाऊया शाळेत ■

(कविता)

चला हो जाऊया शाळेत, शाळेत,
आनंद फुलू दे गालात,
शाळेची पोरं माझ्या हातात, हातात,
नाव कमावतील देशात!

अक्षरं काढतील अंक गिरवतील
रंगही भरतील, चित्रही काढतील
उभारी देऊ त्यांच्या हातात, हातात,
नाव कमावतील देशात!

खेळांत रमतील गाणीही म्हणतील
थोडंसं हसतील थोडंसं रडतील
भात-भाजी देऊ त्यांच्या ताटात, ताटात
नाव कमावतील देशात!

ज्ञानही घेतील सर्वांना वाटतील
कष्टही करतील स्वप्नं सजवतील
स्वप्न उतरवतील सत्यात, सत्यात
नाव कमावतील देशात!

शाळा ही आमची किती सुंदर घर
मुले ही गोड प्रेम करतात फार
संस्कार घडवू त्यांच्या मनात, मनात,
नाव कमावतील मग जगतात!

-०-

06 ऑक्टोबर 2025 सकाळी: 07.58 वाजता
रचनाकार
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
सातारा (महाराष्ट्र)
सेवार्थ निवास : शिक्षण सेवक, जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
-०-

■ बोलके प्रश्न ■ (कविता)

 

■ बोलके प्रश्न 
(कविता)
बोलण्यासारखं बरंच आहे
पण बोलायचं नाही;
व्यक्त होण्यासारखं खूप आहे
पण व्यक्त व्हायचं नाही.

हलक्या मनाची असतीलही काही
मग आपलं मन मोठं करायचंही नाही?
मोठ्या दिलाची मनाचीही हो आहेत
मग मन खोलायचंही नाही?
कळंना, बोलण्यासारखं......

हो ला हो, ना ला ना रहायचंय
मग स्वत:ला विचारायचंही नाही?
जगणं छोटं होऊ पहातंय गड्या
मोठं करुन बघायचंही नाही?
वाटतं, बोलण्यासारखं......

इथं चांगलीही मनं आहेत हो
मग मन मोकळं करायचंही नाही?
तशीच आहेत तत्वाची छान
तर विचारमंथन करायचंही नाही?
निशब्द, बोलण्यासारखं.....

शंड होऊन जगू नका शिकलो, शिकवलं
मग स्वाभिमानानं जगायचंही नाही?
स्वार्थासाठी जे जगतात तर जगू देत
मग मी निस्वार्थी वागायचंही नाही?
काय करावं, बोलण्यासारखं........

मी कोण, काय अधिकार माझा?
ठरलयं का गप्पच रहायचं बोलायचं नाही?
जागेच आहेत पण झोपलेत, झोपणारच
पण आता त्यांना उठवायचंही नाही?
समजलं, बोलण्यासारखं......

समजतंय मलाही व त्यांनाही
पण कोणालाही समजवायचं नाही.
आपलं चागलं काम करतच रहायचं
पण मात्र वाजवायचं नाही.
-०-
०५ नोव्हेंबर २०२४ रात्री ९.०० वाजता
रचनाकार
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
सातारा (महाराष्ट्र)
सेवार्थ निवास : शिक्षण सेवक, जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
-०-


'वाट पहातो आहे' (कविता) - मच्छिंद्र भिसे


'वाट पहातो आहे'
(कविता)
------------🙏----------
स्वतःच्या जगण्याचा अर्थ
उशिरा का होईना उमगतो आहे
मावळलेल्या क्षितिजावर
सूर्योदयाची वाट पाहतो आहे.

सुख दुःखाचे क्षण ते क्षणात
मुठीतून सरकले किती
सावलीत क्षणिक सुखाच्या
अक्षय तृप्तीची वाट पाहतो आहे.

भटकंती आता पुरे झाली
संसार माझा भटकतो आहे
कधी संपेल नियतीचा खेळ हा
थांबण्याची वाट पाहतो आहे

पुरे झाले इतरांसाठीचे जगणे
स्वतःचे जगणे विसरलो आहे
अंधारात गडप झालेल्या त्या
प्रकाशाची वाट पाहतो आहे

वाट काट्याची बिकट तरीही
थांबलो न कधी पुढे-पुढे चालतो आहे
आशा उरी ही पोहचेल त्या क्षितिजावर
सुकाळाची वाट पाहतो आहे.   
🌹------------🙏---------🌹
24 जुलै 2020
मच्छिंद्र भिसे ©®
सातारा (महाराष्ट्र)
9730491952
(अध्यापक-कवी-संपादक)
भिरडाचीवाडी (भुईंज), तह. वाई, जिला सातारा (महाराष्ट्र) 415515
ईमेल: machhindra.3585@gmail.com
-0-

■ आज़ादी वैचारिक बंधनों से ■ (आलेख) - मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'

  ■ आज़ादी वैचारिक बंधनों से ■ (आलेख)      वर्तमान समय आपसी साझेदारी, सहयोग और परस्पर समझ का है। प्रत्येक व्यक्ति अपने जीवन को सुखद, समृद्ध ...

आपकी भेट संख्या