मच्छिंद्र बापू भिसे 9730491952 / 9545840063

'छात्र मेरे ईश्वर, ज्ञान मेरी पुष्पमाला, अर्पण हो छात्र के अंतरमन में, यही हो जीवन का खेल निराला'- मच्छिंद्र बापू भिसे,भिरडाचीवाडी, पो. भुईंज, तहसील वाई, जिला सातारा ४१५५१५ : 9730491952 : 9545840063 - "आपका सहृदय स्वागत हैं।"

मराठी साहित्य


'शब्दांचा जागर'
(गझल)
------------🙏----------
शब्दांचे मोती घडण्यास अवधी आहे,
कविता लिहीत आहे कवी बनण्यास अवधी आहे.

सूर्योदय शब्द पहाट होत आहे,
शब्द आरवतो आहे भूपाळी बनण्यास अवधी आहे.

शब्दांची घालमेल नुसतीच करतो आहे,
अभंग लिहित आहे ओवी बनण्यास अवधी आहे.

छंदांचा गंध शब्दांना लावतो आहे,
गाणं लिहीत आहे गीत बनण्यास अवधी आहे.

अक्षरांना ओळीत आरूढ करतो आहे,
भैरवी लिहीत आहे भारुड बनण्यास अवधी आहे.

कृष्णाची राधा शब्दांमध्ये पहातो आहे,
माठ भरला आहे गवळण बनण्यास अवधी आहे.

शाहिरी साज शब्दांना चढवतो आहे,
डफावर थाप आहे पोवाडा बनण्यास अवधी आहे.

शब्दांना नख शिखांत सजवतो आहे,
सुंदरा सजली आहे लावणी बनण्यास अवधी आहे.

मायेचा शब्दांवर हात फिरवतो आहे,
शब्द बोलका आहे शब्दधुंद बनण्यास अवधी आहे.
🌹------------🙏---------🌹
17 ऑगस्ट 2020
मच्छिंद्र भिसे ©®
सातारा (महाराष्ट्र)
9730491952
🌹------------🙏---------🌹


'वाट पहातो आहे'
(कविता)
------------🙏----------
स्वतःच्या जगण्याचा अर्थ
उशिरा का होईना उमगतो आहे
मावळलेल्या क्षितिजावर
सूर्योदयाची वाट पाहतो आहे.

सुख दुःखाचे क्षण ते क्षणात
मुठीतून सरकले किती
सावलीत क्षणिक सुखाच्या
अक्षय तृप्तीची वाट पाहतो आहे.

भटकंती आता पुरे झाली
संसार माझा भटकतो आहे
कधी संपेल नियतीचा खेळ हा
थांबण्याची वाट पाहतो आहे

पुरे झाले इतरांसाठीचे जगणे
स्वतःचे जगणे विसरलो आहे
अंधारात गडप झालेल्या त्या
प्रकाशाची वाट पाहतो आहे

वाट काट्याची बिकट तरीही
थांबलो न कधी पुढे-पुढे चालतो आहे
आशा उरी ही पोहचेल त्या क्षितिजावर
सुकाळाची वाट पाहतो आहे.   
🌹------------🙏---------🌹
24 जुलै 2020
मच्छिंद्र भिसे ©®
सातारा (महाराष्ट्र)
9730491952
(अध्यापक-कवी-संपादक)
भिरडाचीवाडी (भुईंज), तह. वाई, जिला सातारा (महाराष्ट्र) 415515
ईमेल: machhindra.3585@gmail.com
-0-

No comments:

Post a Comment

गुरूने केला शिष्याचा गौरव व कौतुक

  माझ्या किसन वीर कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख व पुरस्कार समारंभांचे अध्यक्ष प्रो.डॉ.भानुदास आगेडकर सरांचे कार्यक्रमा संदर्भातील अनुभव गुरु शब...

आपकी भेट संख्या