मच्छिंद्र बापू भिसे 9730491952 / 9545840063

'छात्र मेरे ईश्वर, ज्ञान मेरी पुष्पमाला, अर्पण हो छात्र के अंतरमन में, यही हो जीवन का खेल निराला'- मच्छिंद्र बापू भिसे,भिरडाचीवाडी, पो. भुईंज, तहसील वाई, जिला सातारा ४१५५१५ : 9730491952 : 9545840063 - "आपका सहृदय स्वागत हैं।"

गुरूने केला शिष्याचा गौरव व कौतुक

 माझ्या किसन वीर कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख व पुरस्कार समारंभांचे अध्यक्ष प्रो.डॉ.भानुदास आगेडकर सरांचे कार्यक्रमा संदर्भातील अनुभव गुरु शब्दातून व्यक्त 

गुरूने केला शिष्याचा गौरव व कौतुक

दि.10 फेब्रुवारी 2024, राष्ट्रभाषा भवन, सातारा


प्रिय गणेश

*आज माझ्या* आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि गौरवपूर्ण क्षण अनुभवला.आपण चांगल्या माणसांच्या सतत संपर्कात राहिल्याने आपल्या हातून जे संस्कारानुरुप सतकर्म होऊन जाते त्याचे सन्मानपूर्वक फळ मिळतेच याचा प्रत्यय आज मला आल्याने आपण खऱ्या अर्थाने शिक्षक झाल्याचे आणि असल्याचा सार्थ अभिमान वाटला.आज सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाने आयोजीत केलेल्या गुणी व उपक्रमशील  शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षपद याच सतकर्माचे रसाळ फळ असल्याची मला व्यासपीठावर बसल्या पासून प्रकर्षाने जाणीव होत होती.परम आदरणीय भाऊंनी जनतेच्या या राऊळात मला संधी आणि माझ्या गुणावगुणांसह मला सहंन करुन नेहमी आपल्या कुवती नुसार वंचितांना मदत करण्याची म्हणजे निस्वार्थी भावाने सेवा करण्याची जी सवय लावलेली आहे ; त्यांचेकडून आपल्याला मिळालेल्या या संस्कारशील सतकार्याचा आज मला आभिमान वाटून एक शिक्षक असल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.आपण करत असलेल्या निस्वार्थी कार्याचा अभिमान त्यावेळी वाटला जेव्हा आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी *मच्छिद्र भिसेला* मिळालेल्या गौरवाला उत्तर देत असताना त्याने अभिमानाने मी किसन वीर महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि अत्यंत भावनिक होऊन मला जर प्रा.गणेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने सर्व प्रकारची मदत केली नसती तर आज मी या ठिकाणी नसतो माझा हा पुरस्कार मी या दोघांना अर्पण करतोय.त्याचे हे शब्द मला  शिक्षक म्हणून मिळणाऱ्या कोट्यावधी पुरस्कारा पेक्षा अनमोल वाटले.

खरच आपण नशिबवान अहोत निस्वार्थी आणि परिसासम व्यक्तिंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आयुष्याच सोन झालेल आहे याची जाणीव मला नेहमीच असते आज जरा जास्तच तीव्रतेने  अनुभवत होतो म्हणून तुझ्याशी शेअर करावस वाटल.

डॉ. भानुदास आगेडकर
हिंदी विभागाध्यक्ष, किसन वीर कॉलेज, वाई
अध्यक्ष, पुरस्कार वितरण समारोह
दि. १० फेब्रुवारी २०२४
राष्ट्रभाषा भवन


-०-

No comments:

Post a Comment

■ देशवासियों के नाम हिंदी की पाती ■

  ■ देशवासियों के नाम हिंदी की पाती  ■ (पत्रलेखन) मेरे देशवासियों, सभी का अभिनंदन! सभी को अभिवादन!       आप सभी को मैं-  तू, तुम या आप कहूँ?...

आपकी भेट संख्या