मच्छिंद्र बापू भिसे 9730491952 / 9545840063

'छात्र मेरे ईश्वर, ज्ञान मेरी पुष्पमाला, अर्पण हो छात्र के अंतरमन में, यही हो जीवन का खेल निराला'- मच्छिंद्र बापू भिसे,भिरडाचीवाडी, पो. भुईंज, तहसील वाई, जिला सातारा ४१५५१५ : 9730491952 : 9545840063 - "आपका सहृदय स्वागत हैं।"

■ चला हो जाऊया शाळेत ■ (मराठी कविता)

■ चला हो जाऊया शाळेत ■

(कविता)

चला हो जाऊया शाळेत, शाळेत,
आनंद फुलू दे गालात,
शाळेची पोरं माझ्या हातात, हातात,
नाव कमावतील देशात!

अक्षरं काढतील अंक गिरवतील
रंगही भरतील, चित्रही काढतील
उभारी देऊ त्यांच्या हातात, हातात,
नाव कमावतील देशात!

खेळांत रमतील गाणीही म्हणतील
थोडंसं हसतील थोडंसं रडतील
भात-भाजी देऊ त्यांच्या ताटात, ताटात
नाव कमावतील देशात!

ज्ञानही घेतील सर्वांना वाटतील
कष्टही करतील स्वप्नं सजवतील
स्वप्न उतरवतील सत्यात, सत्यात
नाव कमावतील देशात!

शाळा ही आमची किती सुंदर घर
मुले ही गोड प्रेम करतात फार
संस्कार घडवू त्यांच्या मनात, मनात,
नाव कमावतील मग जगतात!

-०-

06 ऑक्टोबर 2025 सकाळी: 07.58 वाजता
रचनाकार
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
सातारा (महाराष्ट्र)
सेवार्थ निवास : शिक्षण सेवक, जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
-०-

■ चला हो जाऊया शाळेत ■ (मराठी कविता)

■ चला हो जाऊया शाळेत ■ (कविता) चला हो जाऊया शाळेत, शाळेत, आनंद फुलू दे गालात, शाळेची पोरं माझ्या हातात, हातात, नाव कमावतील देशात! अक्षरं काढ...

आपकी भेट संख्या