■ बोलके प्रश्न ■
(कविता)
बोलण्यासारखं बरंच आहे
पण बोलायचं नाही;
व्यक्त होण्यासारखं खूप आहे
पण व्यक्त व्हायचं नाही.
हलक्या मनाची असतीलही काही
मग आपलं मन मोठं करायचंही नाही?
मोठ्या दिलाची मनाचीही हो आहेत
मग मन खोलायचंही नाही?
कळंना, बोलण्यासारखं......
हो ला हो, ना ला ना रहायचंय
मग स्वत:ला विचारायचंही नाही?
जगणं छोटं होऊ पहातंय गड्या
मोठं करुन बघायचंही नाही?
वाटतं, बोलण्यासारखं......
इथं चांगलीही मनं आहेत हो
मग मन मोकळं करायचंही नाही?
तशीच आहेत तत्वाची छान
तर विचारमंथन करायचंही नाही?
निशब्द, बोलण्यासारखं.....
शंड होऊन जगू नका शिकलो, शिकवलं
मग स्वाभिमानानं जगायचंही नाही?
स्वार्थासाठी जे जगतात तर जगू देत
मग मी निस्वार्थी वागायचंही नाही?
काय करावं, बोलण्यासारखं........
मी कोण, काय अधिकार माझा?
ठरलयं का गप्पच रहायचं बोलायचं नाही?
जागेच आहेत पण झोपलेत, झोपणारच
पण आता त्यांना उठवायचंही नाही?
समजलं, बोलण्यासारखं......
समजतंय मलाही व त्यांनाही
पण कोणालाही समजवायचं नाही.
आपलं चागलं काम करतच रहायचं
पण मात्र वाजवायचं नाही.
-०-
०५ नोव्हेंबर २०२४ रात्री ९.०० वाजता
रचनाकार
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
सातारा (महाराष्ट्र)
सेवार्थ निवास : शिक्षण सेवक, जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
-०-