मच्छिंद्र बापू भिसे 9730491952 / 9545840063

'छात्र मेरे ईश्वर, ज्ञान मेरी पुष्पमाला, अर्पण हो छात्र के अंतरमन में, यही हो जीवन का खेल निराला'- मच्छिंद्र बापू भिसे,भिरडाचीवाडी, पो. भुईंज, तहसील वाई, जिला सातारा ४१५५१५ : 9730491952 : 9545840063 - "आपका सहृदय स्वागत हैं।"

माझ्या गुरुमाऊलींचा आशिर्वाद शब्द संदेश

 माझ्या गुरु माऊलींचा आशिर्वाद शब्द संदेश

*आपण शिक्षक* या भूमिकेतून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांशी आपला संपर्क येतो प्रत्येकजण लक्षात रहात नसला तरी जे लक्षात राहिले पाहिजेत त्यांचा विसर पडत नाही आणि ते ही विसरत नाहीत.परिस्थितीचे अत्यंत कठोर चटके सहन केलेला आणि आपल्या सातत्यपूर्ण बेस्ट प्रयत्नांची पराकाष्टा करणारा आमचा अत्यंत विनम्र विद्यार्थी मित्र *मच्छिंद्र भिसे* हा असाच एक गुणी शिक्षक.घरात शिक्षणाची कसलीच परंपरा नसलेल्या या मुलांने हिंदी विषय आणि भाषेमध्ये जी गति प्राप्त केली आहे ती खरोखर थक्क करणारी आहे.तंत्रज्ञानाच्या वापराचं उत्तम ज्ञान त्याच्या व्यक्तीमत्वाची गरिमा वाढवणारा भाग आहे.आपल्याला नाही शिकता आलं पण आपला दादा शिकतो म्हणून बकरी संभाळत वय विसरून लहान असून ही मोठया भावाची भूमिका निभावणारा बंधू पोपट याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.असा एक प्रसंग आला की आपली सगळी बकरी विकून पोपटने मच्छिंद्रला बी .एड करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद करून दिली.खडतरपेक्षा ही खडतर प्रवास करणाऱ्या या गुणी विद्यार्थी मित्राला काल सातारा जिल्हयातील हिंदि विषया करीता दिला जाणारा *उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं*.

आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आपल्या गुरुच्या हस्ते व्हावं हा माझ्या आनंदाचा आणि समाधानाचा उच्च भाग आहे.ज्या जनता शिक्षण संस्थेत काम करतो त्याचे विश्वस्त आदरणीय भाऊ आणि आदरणीय मदनदादा ज्या हेतूने आणि ज्या निस्पृहपणे आजवर कार्यरत राहिले आहेत त्यातला ००.१ इतक्या छोट्या अंशाला केवळ स्पर्श करू शकलो मला सार्थकतेचं धन मिळाल्याचं समाधान आहे.मच्छिंद्रला वर्गात मी शिकवलं व मला डॉ.भानुदास आगेडकर सरांनी शिकवलं हा प्रवास आनंददायी आहेच पण मी आणि आगेडकर सर याचं श्रेय अतिशय निर्मळपणे आदरणीय भाऊ आणि दादांच आहे असं समजतो.

मला पुरस्कार कार्यक्रमाला हजर नाही रहाता आलं परंतु पुरस्कार घेतल्यावर तो आनंद शेअर करण्यासाठी मच्छिंद्र थेट माझ्या घरी आला माझ्या आई वडीलांचे आशीर्वाद घेतले हे समाधान हा आनंद कशात मोजता येईल ? हा पुरस्कार घेण्यासाठी तो एकहजार टक्के पात्रच आहे.पुरस्कारासाठी ज्यांनी निवड केली त्यांना मनपूर्वक धन्यवाद.दिशा ॲकॅडमीचे सर्वेसर्वा आमचे मित्र डॉ.नितीन कदम यांनी मच्छिंद्रला त्यांच्या माध्यमिक स्कूल मध्ये सहभागी करून घेतलेलं आहे त्यांना स्पेशली धन्यवाद .

खंत एवढीच आहे या गुणी शिक्षकाला अजून सरकारी यंत्रणेचा भाग होता आलेलं नाही पण आशा कायम आहे आज ना उद्या होईल याची.

मित्रा मच्छिंद्रा मन:पूर्वक अभिनंदन व शुभकामना आणि गुरुदेव डॉ.आगेडकरसर प्रणाम.

                  💐💐

            प्रा.गणेश चव्हाण 


शत्-शत् वंदन!

No comments:

Post a Comment

■ देशवासियों के नाम हिंदी की पाती ■

  ■ देशवासियों के नाम हिंदी की पाती  ■ (पत्रलेखन) मेरे देशवासियों, सभी का अभिनंदन! सभी को अभिवादन!       आप सभी को मैं-  तू, तुम या आप कहूँ?...

आपकी भेट संख्या