'गुरुजन माझे दैवत जगती'
(प्रार्थना)
------------🙏----------
गुरुजन माझे दैवत जगती
ज्ञान गंगेचे दीप लावती.
हात हाती घेऊन आपुला
स्वच्छंद अक्षर मोती सजवती,
रंगभरण करण्या नव्या युगाचे
संस्कार कुंचले रंग भरती,
बेरंग पटावर जगात आपल्या
सुख दुःखाचा मेळ घालती.
मुला फुलांचा बाग बगीचा
माळी होऊन राखण करती,
द्वेष मत्सर गवत वाढले
मृदू वाणीने साफ करती,
सच्चरित्र उमलण्या कळी फुलांची
आदर शिस्तीचे कुंपन घालती.
ज्ञान मंदिर शाळा घडावी
तना-मनाने जीव ओतती,
निस्वार्थ भावना उजळ माथा
जगात बालके मुक्त हासती,
ऋण उतराई कधी नसावी
बिकट अंधारी साद घालती.
पदोपदी असावे गुरुचे स्मरण
ईश्वरा आधी वंदावे चरण,
आई विना जग भिकारी
गुरु विना मन विकारी,
गुरु आपली आई होऊनी
ज्ञान पान्हा मज पाजती.
05 सितंबर 2020
मच्छिंद्र भिसे ©®
सातारा (महाराष्ट्र)
9730491952
-0-

------------🙏----------
गुरुजन माझे दैवत जगती
ज्ञान गंगेचे दीप लावती.
हात हाती घेऊन आपुला
स्वच्छंद अक्षर मोती सजवती,
रंगभरण करण्या नव्या युगाचे
संस्कार कुंचले रंग भरती,
बेरंग पटावर जगात आपल्या
सुख दुःखाचा मेळ घालती.
मुला फुलांचा बाग बगीचा
माळी होऊन राखण करती,
द्वेष मत्सर गवत वाढले
मृदू वाणीने साफ करती,
सच्चरित्र उमलण्या कळी फुलांची
आदर शिस्तीचे कुंपन घालती.
ज्ञान मंदिर शाळा घडावी
तना-मनाने जीव ओतती,
निस्वार्थ भावना उजळ माथा
जगात बालके मुक्त हासती,
ऋण उतराई कधी नसावी
बिकट अंधारी साद घालती.
पदोपदी असावे गुरुचे स्मरण
ईश्वरा आधी वंदावे चरण,
आई विना जग भिकारी
गुरु विना मन विकारी,
गुरु आपली आई होऊनी
ज्ञान पान्हा मज पाजती.
🌹------------🙏---------🌹


मच्छिंद्र भिसे ©®
सातारा (महाराष्ट्र)
9730491952
-0-
